agristack update : राज्यात अतिवृष्टी पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये मनुष्य हानी तसेच पाळीव प्राण्यांची हानी आणि शेती पिकाची हानी अशी विविध प्रकारचे नुकसान झाल्याचे पंचनामे शासनाकडे प्राप्त झाले आहेत. यानुसार शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याचे देखील घोषित केले आहे. शासनाच्या मदतीनुसार शेतकऱ्यांना चार लाख रुपयापर्यंत मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मदतीमध्ये नुकसानीच्या प्रकारानुसार रक्कम ठरवण्यात आलेली आहे. चार लाख कि रक्कम फक्त शेतकरी मृत्यू पावलेल्या कुटुंबाला दिली जाणार आहे. इतर रक्कम नुकसानीनुसार वेगवेगळे ठरवण्यात आलेले आहे.
रक्कम मिळणार शेतकरी विशिष्ट क्रमांकावर. agristack update
30 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना लवकरात लवकर रक्कम देण्यासाठी शासनाने अग्रिस्टॅक च्या माध्यमातून रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अग्रिस्टॅक क्रमांक म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक च्या माध्यमातूनच ही रक्कम जमा केली जाणार आहे.
या शेतकऱ्यांना लाभ नाही
शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक आहे त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक नाही अशा शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित होणार नसल्याचे देखील समोर आले आहे. जर अद्याप पर्यंत आपण शेतकरी ओळख क्रमांक मिळवला नसेल तर आपण तो मिळवू देखील शकता. जेणेकरून आपल्याला शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई आपल्या बँक खात्यावर जमा होईल.
अनेक शेतकऱ्यांचे एक गट शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक सोबत जोडलेले आहे. परंतु इतर अन्य गट यामध्ये जोडलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांना आता अधिकचे नुकसान होऊन देखील कमीच क्षेत्राचे नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे जर आपले सर्व गट यासोबत जोडलेले असतील तर आपण आपले इतर गट देखील यामध्ये जोडणे आवश्यक आहे.