महाडीबीटी पोर्टलवरील शेतकऱ्यांसाठी नवीन निवड यादी जाहीर. mahadbt lottery list

mahadbt lottery list राज्य शासनाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) हे सध्या शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

अर्ज प्रक्रिया mahadbt lottery list

या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना साहित्य खरेदीची परवानगी मिळते आणि खरेदी पूर्ण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.

हे पण वाचा:
agristack update मंत्री मंडळ निर्णय: याच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई! agristack update

निवड यादी जाहीर

यंदा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना निवड झाल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आली आहेत किंवा ज्यांना एसएमएस प्राप्त झाला आहे, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ पुढील प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
ladaki bahin ekyc लाडकी बहीण योजना ekyc साठी नवीन संकेतस्थळ! अशी होणार kyc. ladaki bahin ekyc.

पुढील प्रक्रिया

  1. आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे.
  2. खरेदीची नोंदणी व पडताळणी करणे.
  3. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शासनाकडून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाईल.

यादी कशी पहावी?

  • आपल्याला एसएमएस आला असेल तर आपण निवडले गेले आहात याची खात्री समजावी.
  • एसएमएस न आल्यास, आपण महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आपली प्रोफाइल तपासा. तेथे आपल्या नावाची निवड झाली आहे का याची माहिती उपलब्ध होईल.

Leave a Comment