शेतकऱ्यांना दिलासा: नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग झाला सोपा!! nuksan bharpai kyc

nuksan bharpai kyc : राज्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याची जाहीर केले. शासनाच्या घोषणे नंतर शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. शासनाच्या मदती मध्ये मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच कोरडवाहू शेती साठी प्रती हेक्टर 8500 एवढे अनुदान दिले जाणार आहे. बागायती पिकासाठी 17000 रुपये प्रति हेक्टर तर फळबागासाठी 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात शासनाने अनुदान जाहीर केले आहे. यासोबतच खरडून गेलेल्या जमिनीसाठी 18000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या जमिनीत दुरुस्त होऊ शकत नाहीत अशा पद्धतीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 47 हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

जनावरांसाठी देखील मिळणार मदत nuksan bharpai kyc

शासनाने यादरम्यान शेती मनुष्य तसेच पशु यासाठी वेगवेगळे अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. यानुसार राज्यात एकूण 37 हजार 500 जनावरे दगावल्याचा रिपोर्ट शासनाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रति जनावर 32,000 रुपये या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. लहान जनावरांसाठी 20,000 रुपये प्रतिज्ञानावर या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. शेळी ,मेंढी, बकरे, यासाठी प्रत्येकी 4000 हजार रुपये या प्रमाणात अनुदान जाहीर केले आहे. कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000 हजार रुपये तसेच ज्या शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांना 8000 हजार ते 12000 हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना 3000 हजार रुपये एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे.


अनुदान मिळणार सोप्या पद्धतीने

याआधी प्रत्येक वेळी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक होते. परंतु राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता केवायसी करण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शासन त्वरित शेतकऱ्यांपर्यंत अनुदानाची रक्कम वितरित करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.

हे पण वाचा:
mahadbt lottery list महाडीबीटी पोर्टलवरील शेतकऱ्यांसाठी नवीन निवड यादी जाहीर. mahadbt lottery list

दिवाळीपूर्वीच मिळणार शेतकऱ्यांना मदत

शासनाने या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने इ केवायसी रद्द केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. काही भागातील नुकसानीचे पंचनामे अद्याप पर्यंत बाकी असल्याचे दिसून आल्यामुळे पंचनामासाठी देखील मुदत वाढ देण्यात आलेले आहे. पुढील आठवड्या मध्ये सर्व पंचनामे पूर्ण करून नंतर शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक लाभ मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

Leave a Comment